प्रेम, तिरस्कार, भय, रहस्य, असहायता, असुरक्षितता आणि बदला अशा अनेक भावनांनी भरलेला ‘बुलबुल’ समाजातील जाचक वास्तव मांडतो.
बुलबुल राक्षस नाही आणि माणूसही नाही. पण ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो, त्या त्या ठिकाणी तारणहार ठरणारी ती देवी आहे. लोकशाही असणाऱ्या देशात प्रत्येकाच्या मताला किंमत असते, हे अगदी खरं आहे. पण बलात्कार झाल्यावर, विनयभंग झाल्यावर त्यावर खटले दाखल होतात. निकाल लागेपर्यंत वर्षं जातात. पण हा सिनेमा आहे. त्यामुळे त्यात अन्याय झालेल्या ठिकाणी आणि ती केलेल्या लोकांना त्यांच्या घृणास्पद कृत्याची तात्काळ शिक्षा होते.......